बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने जवळपास 359 अंकांच्या तेजीसह चांगली मजल मारली आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतामध्ये वित्त, औषध आणि आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये लिलाव झाल्याने भारतीय बाजारामध्ये तेजी परतली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्सने 358.83 अंकांसह 0.69 टक्क्यांच्या मजबूतीसह निर्देशांक 52,300.47 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 102.40 अंकांसोबत 0.65 टक्क्यांची कामगिरी करत निर्देशांक 15,737.75 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समध्ये समावेश असणाऱया समभागांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, भारतीय स्टेट बँक, इंडसइंड बँक, डॉ.रेड्डीज लॅब, टेक महिंद्रा, आयटीसी आणि कोटक बँक यांचे समभाग जवळपास 7.29 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला बजाज ऑटो, मारुती सुझुकी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्प, ओएनजीसी आणि नेस्ले यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्समधील समावेश असणाऱया 30 समभागांपैकी 23 समभाग लाभात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असून काही राज्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. केंद्र सरकारने मोफत लसीकरण आणि अन्नधान्य उपलब्ध करण्याची घोषणा केली असून आणखी एक आर्थिक पॅकेज देणार असल्याचे म्हटले आहे. याचाही सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसला आहे.
अन्य घडामोडींचा प्रभाव
जागतिक पातळीवरील प्रमुख घडामोडींपैकी अमेरिकेमध्ये मे महिन्यातील पतधोरणासंदर्भातील आकडे सादर होण्याअगोदरच आशियातील अन्य बाजारांमध्ये तेजीचे वातावरण राहिले आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी घसरुन 73.06 वर बंद झाला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बजाज फायनान्स 6087
- बजाज फिनसर्व्ह 11991
- स्टेट बँक………. 432
- इंडसइंड बँक.. 1023
- डॉ.रेड्डीज लॅब्ज 5290
- आयटीसी…….. 209
- टेक महिंद्रा…. 1065
- कोटक महिंद्रा. 1802
- हिंदुस्थान युनि 2380
- ऍक्सिस बँक….. 743
- भारती एअरटेल 545
- इन्फोसिस….. 1424
- आयसीआयसीआय 640
- एचडीएफसी.. 2560
- टीसीएस……. 3216
- सन फार्मा……. 676
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2182
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 807
- टायटन……… 1735
- एनटीपीसी…… 118
- एशियन पेन्ट्स 2950
- एचडीएफसी बँक 1481
- लार्सन ऍण्ड टुबो 1519
- एलआयसी हाऊसिंग 527
- डिव्हिस लॅब.. 4375
- बायोकॉन…….. 414
- विप्रो………….. 554
- ग्लेनमार्क……… 633
- मॅरिको………… 495
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज ऑटो… 4184
- मारुती सुझुकी 7199
- एचसीएल टेक.. 968
- अल्ट्राटेक सिमेंट 6706
- पॉवरग्रिड कॉर्प. 241
- ओएनजीसी….. 123
- नेस्ले……….. 17560
- कॉन्टिनिअर कॉर्प 696
- आयशर मोर्ट्स 2702
- अदानी पोर्टस्… 846
- एचपीसीएल…. 298
- एबीबी इंडिया 1670