वैभववाडी / वार्ताहर-
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात पोलिस तपासणी नाका उभारा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. पोलीस प्रशासनाने त्याला प्रतिसाद देत केवळ 24 तासात भुईबावडा घाटात तपासणी नाका सुरू केला आहे. राणेंच्या मागणीला यश आले आहे. जिल्हा अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी शनिवारपासून भुईबावडा घाटात पोलिस तपासणी नाका कार्यान्वित केला. भुईबावडा रिंगेवाडी बस थांब्यानजीक गाव संनियंत्रण समिती यांच्या सहकार्याने हा तपासणी नाका सुरू झाला आहे. नाका सुरू झाल्याने भुईबावडा पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार नितेश राणे, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व माजी उपसभापती भालचंद्र साठे यांचे आभार मानले.