वार्ताहर/ किणये
मंडोळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या कंपाऊंडचे उद्घाटन मोठय़ा थाटात करण्यात आले. या उद्घाटन सोहळय़ानिमित्त गावात भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले असल्यामुळे गाव भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या सोहळय़ाच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये एकीचे दर्शन दिसून आले.
कंपाऊंडचे उद्घाटन आनंद वामन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन वाय. बी. नावगेकर यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती पूजन परशराम शहापूरकर यांनी केले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन धारकऱयांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला एम. के. पाटील, केदारी तलवार, सतीश कदम, परशराम कडोलकर, नारायण शिंदे, जोतिबा साळवी, प्रवीण हुंदरे, चंद्रकांत पाटील, गजानन फगरे, जोतिबा आंबेवाडीकर, श्रीकांत शहापूरकर, जोतिबा पाटील, लक्ष्मण शहापूरकर, शंकर कंग्राळकर, शंकर गेणूचे आदींसह शिवप्रति÷ान हिंदुस्थान मंडोळी शाखेचे कार्यकर्ते, पंच मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली. रात्री सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळाचा जागर भजनाचा कार्यक्रम झाला.