प्रतिनिधी /धारबांदोडा
सावर्डे मतदार संघाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या वाढदिनानिमित्त आज सोमवार 18 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9 वा. मेटवाडा कुळे येथील मळीकेश्वर देवस्थानजवळ तीन एमएलडी क्षमतेच्या पाणी प्रकल्पाची पायाभरणी मंत्री दीपक पाऊसकर यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, सरपंच मनिष लांबोर, मोलेच्या सरपंच तन्वी केरकर, स्थानिक पंचसदस्य मावरीस डिकॉस्ता व इतर पंचसदस्य उपस्थित असतील. सायं. 7.30 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते आनंदवाडी सावर्डे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मंत्री दीपक पाऊसकर जनतेच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित असतील. दिवसभर विधानसभा अधिवेशनात स्वस्त राहणार असल्याने ते सकाळी 10.30 ते सायं. 7.30 वा. यावेळेत वाढदिनाच्या शुभेच्छा स्विकारु शकणार नाहीत.