प्रतिनिधी / मडगाव
कोरोनाचा एकही रूग्ण गोव्यात नसल्याने, गोव्याचा ग्रीन झोन मध्ये समावेश झाला. त्याच बरोबर लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात मोठय़ा प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने मडगाव शहरातील 80 टक्के बाजारपेठ काल सोमवारपासून खुली झाली. त्यात प्रामुख्याने मडगावच्या न्यू मार्केट व गांधी मार्केटचा समावेश होता.
न्यू मार्केट व गांधी मार्केट या मडगाव शहरातील प्रमुख बाजारपेठा. त्यात न्यू मार्केट मध्ये नेहमीच लोकांची गर्दी असते. पण, लॉकडाऊनमध्ये जी शिथिलता दिली आहे. तिचे योग्यरित्या पालन करण्यात येईल, त्याच बरोबर मार्केटमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याची माहिती न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिली.
न्यू मार्केटमध्ये सफेद व पिवळे असे पट्टे मारण्यात आले असून सफेद पट्टय़ातील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार तर पिवळय़ा पट्टय़ातील दुकाने मंगळवार, गुरूवार व शनिवार अशी खुली केली जाणार आहेत. त्यामुळे मार्केटात पूर्वी सारखी गर्दी होणार नसल्याचे श्री. शिरोडकर म्हणाले. काल, मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी न्यू मार्केट व गांधी मार्केटला भेट देऊन पहाणी केली व सद्या जी व्यापाऱयांनी व्यवस्था केली आहे. त्यावर समाधान व्यक्त केले आहे.
जे व्यापारी आपल्या दुकानाच्या बाहेर सामान लावतात, ते बंद करण्याचा आदेशही त्यांनी काल व्यापाऱयांना दिला आहे. जर दुकानाच्या बाहेर सामान लावले तर त्याचा त्रास ग्राहकांना होईल. त्याच बरोबर पदपथ मोकळे रहाणार नाही. साहजिकच लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यापाऱयांनी स्वता शिस्त बाळगली पाहिजे असे ही त्यांनी स्पष्ट केले.
‘मास्क’चा वापर करा
न्यू मार्केटात येणाऱया सर्व ग्राहकांनी तसेच व्यापाऱयांनी न चुकता मास्क वापरावे अशी सूचना विनोद शिरोडकर यांनी केली आहे. लॉकडाऊन मध्ये जी मार्गदर्शन तत्वे घालून दिलेली आहे, त्याचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
गांधी मार्केटमधील व्यवहार देखील काल पासून पुन्हा सुरू झाला. येथील बंद असलेली भाजीची दुकाने काल पासून पुन्हा सुरू झाली. या पूर्वी लोकांनी खरेदी साठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याने गांधी मार्केट बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काल पासून ते पुन्हा सुरू झाले. काल अनेकांनी आपली स्वताची वाहने घेऊन मार्केटमध्ये येणे पसंत केल्याने वाहनांची गर्दी होती.
केश कर्तनालयात गर्दी
काल पासून केश कर्तनालये पुन्हा खुली झाली. गेले कित्येक दिवस केश कर्तनालयाची वाट पहाणाऱयांना त्यामुळे दिलासा मिळाला. काल पहिल्याच दिवशी केस व दाडी काढण्याठी अनेकांनी केश कर्तनालयामध्ये गर्दी केली होती.