ऑनलाईन टीम / मथुरा :
मथुरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता आरोग्य विभागातून चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. बुधवारी जिल्हा रुग्णालयातील मुख्य चिकित्सा अधीक्षकालाच कोरोनाची बाधा झाली असल्याचे समजत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील मुख्य चिकित्सा अधीक्षक पॉझिटिव्ह आढळल्यावर रुग्णालयातील चिकित्सक, कर्मचारी आणि 18 लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 181 झाली आहे.
दरम्यान, मथुरा जिल्हा रुग्णालयाचे मुख्य चिकित्सा अधीक्षक मागील काही दिवसांपासून सुट्टीवर होते. या दरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली असता बुधवारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.