ऑनलाईन टीम / मुंबई :
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच झेंडा बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडा बदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे.
दरम्यान, पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षाचं महाअधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरे अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र, आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाचं जवळपास निश्चित झाल्याचं दिसून येतंय.