क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या व गोपाळ जिनगौडा पदवीपूर्व महाविद्यालय शिंदोळी आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
मराठामंडळ संघाच्या थ्ा्राs बॉल संघाने विजेतेपद, खो-खो संघाने उपविजेतेपद पटकाविले तर धावण्याच्या स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
मुन्नोळी (सौंदत्ती) येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खोमध्ये चिन्मय पाटील, सुजित धुलजी, मुलींमध्ये निहा चौगुले, राधिका कुटे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली. कुस्तीमध्ये चिन्मय पाटील, मुळगीहालबीडी येथे झालेल्या थ्रो बॉल स्पर्धेनंतर भगत अकनोजी, राणी मुचंडीकर यांची बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना प्रा. एस. एस. पाटील, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभत असून, क्रीडा प्राध्यापक चंद्रकांत गोमाण्णाचे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.