प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 276 सैनिकांचा दीक्षांत समारंभ शनिवारी सकाळी पार पडला. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे ब्रिगेडिअर एम. एस. मोका यांनी सैनिकांना कर्तव्यनि÷तेची शपथ दिली.
यावेळी ते म्हणाले, इन्फंट्रीची वैभवशाली परंपरा आणि शान वृद्धींगत करण्याची जबाबदारी तुमची आहे. शिस्त आणि सुदृढ आरोग्य याला सैनिकांनी महत्त्व दिले पाहिजे. इन्फंट्रीमधील प्रशिक्षणाचा या सेवेत तुम्ही उपयोग करून घ्या आणि देश रक्षणासाठी सदैव तत्पर रहा.
सैनिकांनी पाहुण्यांसमोर शानदार पथसंचलन केले. त्याचे नेतृत्व धरम माताजी यांनी व मेजर डी. एस. राठोड यांनी केले. यावेळी उत्कृष्ट सैनिकासाठी देण्यात येणारे यशवंत घाटगे व्हिक्टोरिया क्रॉस पदक आकाश परदेशी याला देण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते शर्कत वॉर स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.