वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या विन्स्टन-सालेम खुल्या एटीपी पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अँडी मरेने एकेरीत विजयी सलामी दिली पण ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसने दुखापतीमुळे शेवटच्याक्षणी स्पर्धेतून माघार घेतली.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या अँडी मरेने रूबीनवर 58 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-0 अशा मात करत विजयी सलामी दिली. मरेचा दुसऱया फेरीतील सामना टिफोईबरोबर होणार आहे. 34 वर्षीय मरेने पहिल्या फेरीतील सामन्यात 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गिओसने दुखापतीमुळे शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतली आहे. किर्गिओसच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याला सातत्याने वेदना जाणवत आहेत.