शाहुवाडी / प्रतिनिधी
कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी मलकापूर येथे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहुवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करून विटंबना करणाऱ्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून असे कृत्य करणार्यां विरोधात सर्वत्र संतप्त भावना निर्माण होऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मलकापूर येथे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शाहुवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने आंदोलन करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. अशा घटना करणाऱ्यांना कडक शासन होणे गरजेचे असून कर्नाटकातील राज्यकर्त्यांनी केलेले वक्तव्य ही निषेधार्थ असल्याचे मनोगत यावेळी माजी सभापती विजय खोत, तालुका प्रमुख दत्ता पवार, दिनकर लोहार यांनी व्यक्त केले
या आंदोलनात माजी सभापती विजय खोत नगरसेविका संगीता कुंभार माया पाटील मलकापूर शहर शिवसेनाप्रमुख बाबुराव चांदणे माजी नगरसेवक विनायक कुंभार माजी नगराध्यक्ष राजू भोपळे नगरसेवक सुभाष कोळेकर राहुल पवार धोंडीराम सोने प्रकाश चौगुले बाबुराव सोनवळे महिला आघाडीच्या अलका भालेकर पूनम भोसले आदींच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.