कामावर जावे का मुलांची देखभाल करावी?
अमेरिकेत मुलांची देखभाल करणाऱया अनेक चाइल्ड केअर सेंटर्स महामारीच्या काळात बंद झाल्या आहेत. काही सुरू आहेत. पण तेथे मर्यादित संख्येतच मुलांना ठेवण्यात येत आहे. काही महिला कामावर जाऊ इच्छितात, पण चाइल्ड केअरमध्ये जागा न मिळाल्याने त्यांना मुलांच्या देखभालीला प्राधान्य द्यावे लागत आहे. यामुळे अमेरिकेत महिलांसमोर कामावर परतण्याचे संकट वाढले आहे.
महिला कामावर न परतल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला वर्षाकाठी 60 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 4.40 लाख कोटी रुपये) नुकसान होऊ शकते. पण या स्थितीवर मात करण्यासाठी चाइल्ड केअर आणि शिक्षणासंबंधी अध्यक्ष जो बायडेन यांनी तयार केलेली योजना लवकरच लागू होऊ शकते.
सुमारे 33 कोटी लोकसंख्या असेलल्या अमेरिकेत 66 टक्के पुरुष आणि 54.6 टक्के महिला काम करतात. प्रत्येक कुटुंब स्वतःच्या उत्पन्नाचा एक तृतीयांश हिस्सा म्हणजेच सरासरी 21 हजार डॉलर्सपर्यंत (सुमारे 15 लाख रुपये)ची रक्कम मुलांच्या देखभालीवर खर्च करते.
20 लाख पालकांनी सोडला जॉब चाइल्ड केअर संघटनेनुसार मुलांच्या देखभालीचा राष्ट्रीय सरासरी खर्च सुमारे 7 लाख रुपये आहे. हा आकडा अनेक देशांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. तर अमेरिकन प्रोग्रेस सेंटरनुसार 2016 मध्ये 20 लाख पालकांनी मुलांच्या जबाबदारीमुळे नोकरीच सोडली होती.