ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 195 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 24 हजार 581 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या एकूण 24,581 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 21 हजार 862 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2,462 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 257 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.