ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 6 हजार 397 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 61 हजार 467 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 184 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 5,754 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 30 हजार 458 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 77 हजार 618 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.94 % तर मृत्युदर 2.41 इतका आहे.
- मुंबईत 855 नवे रुग्ण
मुंबईत कालच्या दिवसात 855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 876 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,26,770 वर पोहचली आहे. तर 3,04,736 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,474 इतकी आहे. सद्य स्थितीत 9 हजार 690 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.