ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 132 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 4 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 24 हजार 386 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 257 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 24,386 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2665 पोलीस अधिकारी आणि 21,721 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 21 हजार 593 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2348 पोलीस अधिकारी आणि 19, 245 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2536 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 292 पोलीस अधिकारी आणि 2244 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 257 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 पोलीस ऑफिसर आणि 232 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.