नवी मुंबई
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने मदत कार्यासाठी म्हणून 1.11 कोटी रुपये लिलावातून जमवले असल्याची माहिती आहे. कंपनीने आपल्या नव्या स्पोर्टस् युटिलीटी व्हेईकल ‘थार’ या वाहनाचा ऑनलाईन लिलाव नुकताच केला होता. या लिलावातून कंपनीने 1.11 कोटी रुपये जमवले असून एकूण 2.22 कोटी रुपयांची मदत कोरोना मदत कार्यासाठी दिली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. सदरच्या गाडीसाठी लिलाव हा सहा दिवसांसाठी घेण्यात आला होता, ज्यात देशातील 550 ठिकाणांहून 5500 जणांनी नोंदणी केली होती.