नवी दिल्ली
महिंद्रा समूहाची सहयोगी कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (एमईएमएल)ने बुधवारी सुमन मिश्रा यांना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त केले आहे. मिश्रा या अगोदर महिंद्रा समूहाच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी वरिष्ठ उपाध्यक्षाच्या रुपाने काम करत राहिल्या होत्या. तसेच त्या राजेश जेजुरिकर महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे कार्यकारी संचालक यांना रिपोर्ट करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.