नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्राने आपली नवी एक्सयुव्ही 300 ही कार नुकतीच बाजारात उतरवली आहे. जिची सुरूवातीची किंमत 9.95 लाख रुपये इतकी असणार असल्याचे समजते. इलेक्ट्रीक सनरुफची सोय आता कंपनी ऑटोशिफ्ट एसयुव्ही व मॅन्युअल या दोन्ही मॉडेलकरीता उपलब्ध करणार आहे. महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 पेट्रोल इंधनावरील गाडीचे बुकिंग सुरू झाले आहे. फेबुवारीच्या मध्यावर या गाडीची पूर्तता किंवा डिलिव्हरी केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. डय़ुल टोन रेड व अक्वामरीन या रंगात ही गाडी उपलब्ध करण्यात आली आहे. या गाडीची टक्कर मारुतीच्या ब्रिझा, फोर्डच्या इकोस्पोर्टस, निस्सानच्या मॅग्नाइट, हय़ुंडाईच्या वेन्यू आणि कियाच्या सोनेटशी होणार आहे.