वार्ताहर /हरमल
मांदे येथील ‘साहित्य संगम’ची वार्षिक साहित्यिक सहल नुकतीच पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथे संपन्न झाली. मंडळाच्या तीनशे एकोणऐशीव्या मासिक कार्यक्रमांतर्गत आयोजित या सहली दरम्यान गुढीपूर,पिंगुळी येथील यंदाचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त नामवंत लोककलाकार परशुरामजी विश्राम गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कला अंगणास भेट दिली.तसेच सुप्रसिद्ध लेखिका सौ.वृ?दा कांबळी यांची भेट घेऊन त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी वार्तालाप केला.
परशुरामजी गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कला अंगणातील संग्रहालयाची,तसेच विविध ठाकर आदिवासी कलांची माहिती युवा लोककलाकार चेतन परशुराम गंगावणे व एकनाथ परशुराम गंगावणे यानी दिली.परशुरामजी गंगावणे यांचा ‘साहित्य संगम’तर्फे ज्ये÷ सदस्य कीर्तनकार ह.भ.प. विष्णूबुवा शेटगांवकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी बोलताना परशुरामजी गंगावणे यानी आपल्याला लाभलेला पद्म पुरस्कार हा ठाकर आदिवासी समाजाचा लोककलेचा सन्मान असल्याचे सांगितले.पद्म पुरस्कार वितरण समारंभातील काही ठळक घटनांही त्यानी यावेळी बोलताना कथन केल्या.सहलीत सहभागी सदस्यांनी कळसुत्री बाहुल्यांच्या खेळाचाही आनंद लुटला.
तद्न?तर विपुल प्रमाणात कथा, कादंबऱया तसेच ललित लेखन करणाऱया सिंधुदुर्गातील प्रथितयश साहित्यकि वृ?दा कांबळी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. वार्तालापात आपल्या लेखनाचा प्रारंभ,पती शरद कांबळी यानी दिलेले प्रोत्साहन,आपल्या साहित्यकृतींना मिळत गेलेल्या प्रति÷sच्या विविध पुरस्कारांमुळे लेखनाला आलेला हुरुप आणि सकस लेखन करण्याची वाढत गेलेली जबाबदारी इत्यादी संदर्भात त्यानी सविस्तर माहिती दिली. प्रारंभी ह.भ.प.विष्णूबुवा शेटगांवकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन वृ?दा कांबळी यांचा सन्मान करण्यात आला.वृ?दा कांबळी यानी यावेळी आपली निवडक पुस्तके संगम’ ला भेट दिली.
दोन्ही ठिकाणी ‘साहित्य संगम’चे कार्यवाह प्राचार्य गजानन मांदेकर यानी स्वागत व प्रास्ताविक करून ‘साहित्य संगम’च्या कार्याची माहिती दिली,तर ह.भ.प.विष्णूबुवा शेटगांवकर यानी आपल्या खास विनोदी शैलीत सदस्यांचा परिचय करून दिला.’साहित्य संगम’चे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर यानी ऋणनिर्देश केला.
गेली एकतीस वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया ’साहित्य संगम’च्या कार्याबद्ल परशुरामजी गंगावणे व वृ?दा कांबळी या दोघांनीही गौरवोद्गार काढले.
पिंगुळी येथील सुप्रसिध्द राऊळ महाराज मठास भेट देऊन या वार्षिक साहित्यकि सहलीचा समारोप करण्यात आला.
सहल प्रमुख नारायण सावंत,तसेच प्रभाकर गांवकर,शंकर चोडणकर, पांडुरंग गावडे,शरद गावडे,भोलेश नाईक, सुशांत गावडे, संध्या आरोलकर व सोनाली आरोलकर हे सदस्य या सहलीत सहभागी झाले होते.