बामाको
मध्य मालीत अतिरेक्यांच्या हल्ल्यात 31 नागरिक ठार झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सदरच्या अतिरेक्यांनी एका बसवर हल्ला केला होता, त्यात सदरच्या व्यक्तिंना प्राण गमवावा लागला आहे. बंदुकधाऱया अतिरेक्यांनी बंदीगारा शहराजवळच्या बाजारात बसवर गोळीबार करत प्रथम चालकाचा बळी घेतला आणि नंतर बसला आग लावली. या हल्ल्यामध्ये मृत झालेल्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बसमधील प्रवासी जवळच्या बाजारातील कार्यालयात कामासाठी चालले होते. मालीतला हा हल्ला झिहादी गटाचा असल्याचे सांगितले जाते. बंदुकधाऱयांनी बसमधील लोकांवर अंधाधुंद गोळीबार करत टायर पेटवून देण्याचे कृत्य केले. बंकास शहराचे महापौर मौल्य गींडो यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यातील काहीजण बेपत्ता झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. झिहादींचा मालीवर सततचा हल्ला वाढत असून मालीत या घटनेनंतर चिंतेचे सावट पसरले आहे.