2019-20 आर्थिक वर्षात भारताची मासे निर्यात अंदाजे 5 ते 10 टक्के घटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जगातील चौथा मोठा मासे निर्यात देश म्हणून भारताची ओळख आहे. यंदा मात्र कोरोनामुळे मासे निर्यातीत अडचणी जाणवल्या असल्याचे केंद्रीय मत्स्य खात्याचे मंत्री गिरीराज सिंग यांनी सांगत नियोजीत उद्दिष्ट साध्य करणे अवघड असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताने 2018-19 आर्थिक वर्षात 46 हजार 589 कोटी रुपयांची मासे निर्यात केली आहे. अमेरिका, मध्यआशिया, इंग्लंड व चीन या महत्त्वाच्या देशात भारतातून मासे निर्यात होतात. बोटींच्या प्रवासावर कोरोनामुळे निर्बंध आले असून एकूणच व्यवहारातही घटीचा अनुभव येतो आहे. त्यामुळे पुरवठय़ावर कोरोनाचा इफेक्ट झाला असून यंदा निर्यातीत घट होणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.