सावंतवाडी/ प्रतिनिधी-
पार्ले टिळक कॉलेज, मुंबई येथे मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभ्यासक्रमात आजगांव येथील कु.सफल शेखर प्रभू आजगावकर याने पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याने मिळवलेल्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सफल याने आजगांव येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स इंग्लिश स्कुल मधून १० वी तर सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधून १२ वीचे शिक्षण घेतले होते. सध्या तो टिळक महाविद्यालय पार्ले, मुंबई येथे शिक्षण घेत आहे.