35 वर्षावरील वयोगटासाठी स्पर्धेचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 35 वर्षावरील पुरूष मास्टर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फिनिक्स एव्हिएशनचे सीइओ हर्ष जॉन थॉमस यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे.
सदर मास्टर टी-20 क्रिकेट स्पर्धा 12 नोव्हेंबरपासून युनियन जिमखाना मैदानावर सुरू होणार असून, या स्पर्धेत विश्रुत स्ट्रायकर्स, एक्स्ट्रिम स्पोर्ट्स, के. आर. शेट्टी, किंग्जस, ऍडव्होकेट्स, पाटील लायन्स, फॅन्को क्रिकेट क्लब, बीसीसी मच्छे या संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील सर्व सामने रंगीबेरंगी पोषाखात पांढऱया चेंडूवर खेळविण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेसाठी वैयक्तिक व विजेत्या, उपविजेत्या संघांना झेवियर गोम्स यांनी पोषाख पुरस्कृत केला आहे. 170 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपली नावे नोंदविली होती. त्यामधून 102 खेळाडू लिलावातून निवडले गेले. मास्टर्स गटात होणारी ही बेळगावातील पहिलीच स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते हर्ष जॉन थॉमस यांचा गौरव स्पर्धा सचिव परशराम पाटील यांनी केला. यावेळी मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे उपस्थित होते.