प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगत असलेल्या मिरजोळे पंडयेवाडी येथे अवैधरित्या मद्यसाठा बाळगणाऱयाविरूद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आल़ी एकूण 40 हजार रूपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आल़ा तसेच एका संशयिताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आह़े
दत्ताराम सखाराम मयेकर (59, ऱा मिरजोळे पंडयेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े मिरजोळे पंडयेवाडी येथे संशयित आरोपी हा मद्यविक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पोलिसांकडून या ठिकाणी छापा मारण्यात आला होत़ा यावेळी संशयित आरोपी मयेकर याच्याकडून 10 किंगफिशर बियरचे बॉक्स, 20 लंडन प्लिझर स्ट्रॉग कंपनीच्या बियरचे बॉक्स असा मिळून 40 हजार रूपयांचा मुद्देमाल आढळून आल़ा या प्रकरणी संशयित दत्ताराम मयेकर याला अटक करण्यात आली आह़े पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल जाधव करत आहेत़