ऑनलाईन टीम/तरुण भारत
कर्नाटकातील रामनगर येथे राज्याचे आयटी-बीटी मंत्री सी. एन. अश्वथ नारायण आणि काँग्रेसचे बेंगळूर ग्रामीणचे खासदार डी. के. सुरेश यांच्यात सोमवारी जोरदार हमरीतुमरी झाली. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतच दोघेही व्यासपीठावर एकमेकाला भिडल्याने प्रकरण हातघाईवर आले. त्याबरोबर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून एकच राडा केला.
दरम्यान, रामनगर येथे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मंचावर राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, राज्यमंत्री अश्वथ नारायण हे उपस्थित होते. तसेच यावेळी काँग्रेचे खासदारही यावेळी उपस्थित होते. मंत्री नारायण मंचावर भाषण देत होते. ते रामनगरमध्ये सरकारकडून करण्यात येणारी विकास कार्ये जनतेसमोर मांडत होते. त्याचदरम्यान, काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावरून वातावरण तापले. खासदार डी.के. सुरेश यांनी अश्वथ नारायण यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्याजवळ गेले असता वादाला सुरुवात झाली.
मंत्री अश्वथ नारायण यांचे भाषण सुरु असताना खासदार डी.के. सुरेश आपल्या जागेवरून उठून त्यांच्याजवळ गेले. त्यानंतर दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. हा वाद एवढा वाढला की, मंचावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली. आश्चर्यकारक बाब म्हणजे हा वाद सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा मंचावर मुख्यमंत्री बोम्माई उपस्थित होते.