ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या मेरठमधील केएमसी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मागील 24 तासात 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उत्तरप्रदेशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालयेच आता व्हेंटिलेटरवर आली आहेत. रुग्णालयांमधील ऑक्सिजन वारंवार संपत आहे. त्यामुळे मागील 24 तासांत वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 22 मृत्यू कोरोनामुळे, तर 8 मृत्यू कोरोना संशयितांचे झाले आहेत.
दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे केएमसी रुग्णालयात गेल्या 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, केएमसी प्रशासनाने हे मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाले नसल्याचे म्हटले आहे.