प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काकती येथे घरासमोर उभी करण्यात आलेली एक मोटार सायकल चोरण्यात आली आहे. उपनगरांतही अशा घटना घडल्या आहेत.
सिद्राई कुरबर (रा. काकती) यांनी केए 22 एचई 2549 क्रमांकाची मोटार सायकल आपल्या घरासमोर उभी केली होती. 16 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता त्यांनी मोटार सायकल उभी केली होती. दुसऱया दिवशी सकाळी ती चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या पंधरवडय़ात बेळगाव शहर व उपनगरांत मोटार सायकली चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे घरासमोर दुचाकी उभे करणेही कठीण जात आहे. हॅन्टल लॉक मोडून दुचाकी पळविण्यात येत आहे.