शॅडो कौन्सिलकडून मडगाव पालिकेला जागे करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /मडगाव
शॅडो कौन्सिल फॉर मडगावने मडगाव शहरात सुरू असलेल्या मोबाईल टॉवर्सपासून महसूल वसूल न झाल्यामुळे पालिकेला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर शॅडो कौन्सिलनेच नगरसेवक व माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांना नुकत्याच झालेल्या अंदाजपत्रकी बैठकीत मोबाईल टॉवर्सच्या महसुलाचा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली होती, असे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले आहे.
पंचायतींसह अनेक स्थानिक स्वराज संस्था आपापल्या हद्दीत उभारलेल्या मोबाईल टॉवरकडून मोठय़ा प्रमाणात महसूल गोळा करतात. अंदाजपत्रकी अंदाज आणि गेल्या काही वर्षांत मोबाईल टॉवर्सकडून झालेल्या महसूल वसुलीचे आकडे पाहून आम्हाला धक्का बसला आहे. 2019-20 मध्ये पालिकेने रु. 81000 गोळा केले, तर 2020-21 ची कमाई रु. 291644 होती. सर्वांत धक्कादायक म्हणजे पालिकेने यावेळी रु. 1,32,000 च्या कमाईचा अंदाज लावला होता, परंतु वर्षाच्या अखेरीसपर्यंत पालिकेने संपूर्ण शहरात मोठय़ा संख्येने उभ्या असलेल्या मोबाइल टॉवर्समधून मोठा शून्य मिळवला, अशी टीका कुतिन्हो यांनी केली आहे.
शॅडो कौन्सिल फॉर मडगावची मागणी आहे की. संपूर्ण मडगाव शहरात उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सच्या संख्येची पडताळणी करण्यासाठी सखोल सर्वेक्षण करण्यात यावे आणि ऑपरेटर्सकडून प्रलंबित सर्व देणी वसूल करण्यात यावीत. आमच्या आठवणीनुसार, मोबाईल टॉवर्ससाठी दरवषी 25000 रु. शुल्क निश्चित करण्यात आले होते. नूतनीकरण शुल्काच्या या रकमेनुसार पालिका दरवषी किमान 20 लाख रु. कमावू शकते, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
मडगाव पालिका प्रामाणिकपणे स्वतःहून येऊन कर भरणाऱया नि÷ावंत करदात्यांच्या दयेवर पूर्णपणे टिकून आहे. मागील पालिका मंडळ रिलायन्स कंपनीशी घनि÷ संबंधांसाठी लोकप्रिय होते, त्यांच्या टॉवर्सना वाहतूक बेटे आणि रोड डिव्हायडरच्या मध्यभागीही मान्यता मिळाली, असा टोला कुतिन्हो यांनी हाणला आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱयांनी संबंधित अधिकाऱयांना व नियुक्त केलेल्या वसुली अधिकाऱयांना निर्देश द्यावेत अशी आमची मागणी आहे. हे खरोखरच दुर्दैवी आहे की, आम्हाला पालिकेस त्यांच्या कमाईचे स्रोत निदर्शनास आणून द्यावे लागतात. ते देखील अशा वेळी, जेव्हा पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि त्यांना त्यांच्या कर्मचाऱयांचा पगार देण्यात अडचणी येत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.