प्रतिनिधी/ पणजी
म्हादई प्रश्नी सरकार गांभिर्य घेत नसल्याने आता या विषयी संपूर्ण गोवाभर जनजागृती आंदोलन केले जाणार आहे. तसेच येणाऱया अधिवेशनात विधानसभेवर मगोतर्फे मोर्चा नेला जाणार आहे, असे मगो पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी सांगितले. पणजीत काल मगो पक्षाच्या केदींय समितीची बैठक झाली या बैठकीत म्हादई विषयी चर्चा करण्यात आली.
भाजपकडे सध्या बहूमत असल्याने सरकार आपल्याला हवे ते निर्णय घेत आहे. म्हादईविषयी लोकांची दिशाभूल केली जात आहे. म्हादई असो खाण, बेरोजगारी महागाई या विषयी सरकार स्पष्टीकरण जनतेला देत नाही. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था कोलमोडली आहे. लोकांची प्रशासकीये कामे होत नाही. शेतकरी चिंतेत आहे. गोवा डेअरी संजिवनी साखर कारखाना संकटात आहे. हे सरकर फक्त घोषणा करत आहे कृती काहीच करताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही आता राज्यातील जनतेला सरकारचा दुतेंडीपणा दाखवून देणार आहे. सरकार लोकांची कशी फसवणूक करत आहे. हे जनतेला सांगितले जाणार आहे, असे दिपक ढवळीकर यांनी सांगितले.
डिचोलीत उद्या जनआंदोलत
म्हादई विषयी डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानावर जनआंदोलन केले जाणार आहे. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. नंतर डिचोली rबसस्थानकाजवळील सेतू संगमवर सभा घेतली जाणार आहे. म्हादई गोव्यासाठी किती महत्वाची आहे व त्याचे परिणाम काय होणार आहे हे लोकांना पटवून दिले जाणार आहे. नंतर महिनाभर अन्य ठिकाणी जनआंदोलन केले जाणार आहे, असे माजी आमदार नरेश सावळ यांनी सांगितले.
जिल्हा पंचयातीच्या राखविता जागा जाहीर कराव्या
जिल्हा पंचायतीयच निवडणकूक जवळ अली तरी अजून सरकारने राखविता या जाहीर पेल्या नाही यामुळे पक्षाला उमेदवार ठरविण्यात आडचणी येत आहे. सरकार आपल्या पक्षातील उमेदवारांन चाचपाण्णी देण्यासाठी वेळ काढत आहे. सरकारने ताबडतोब राखिवतेच्या जागा जाहीर कराव्या अशी मागणी ही यावेळी मगो पक्षातर्पे करण्यात आले मगो पक्षा जिल्हा पंचायत निवडणूक लढविणार आहे, असे दिपक ढवळीकर यांनी सांगितले.