राधानगरी पोलिसात परस्पर विरोधात तक्रारी
म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी (ता राधानगरी) येथे एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दोन्ही बाजूचे पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूनी राधानगरी पोलिसात परस्परविरोधा फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
बुधवारी सायंकाळी कुंभारवाडी येथे रस्त्याने जाताना एकमेकाकडे रागाने बघण्या वरुन सदर दोन्ही गटात किरकोळ वाद झाला होता. मात्र जाणकारांनी मध्यस्थी करत भांडण काल रात्रीच मिटविण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी दोन गटातील पुन्हा शाब्दिक वाद होऊ त्याचे पर्यावसन तुंबळ मारामारीत झाले. सदर मारामारीत दोन्हीं बाजूचे रंगराव शंकर कुंभार (वय-४५), रानोजी विष्णू सुतार (वय- ७०),बाळू विष्णू सुतार (वय ६०), विठ्ठल विष्णू सुतार(वय-५५) राजू भाऊ सुतार (वय-४०) जखमी झाले आहेत. जखमीवर कोल्हापूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
राजू भाऊ सुतार याने दिलेल्या फिर्यादी नुसार रंगराव शंकर कुंभार,इंद्रजीत रंगराव कुंभार, निलेश विलास कुंभार, दत्तात्रय विष्णू कुंभार,ओंकार रंगराव कुंभार आदींनी कामावर जाताना रस्त्यात अडवून लोखंडी फरशीने मारहाण करत शिवीगाळ केल्याची तर इंद्रजीत रंगराव कुंभार याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजू भाऊ सुतार, रानोजी विष्णू सुतार, विठ्ठल विष्णू सुतार, अमर नंदू सुतार, विश्वनाथ बाळू सुतार, बाळू विष्णू सुतार, संजय भाऊ सुतार यांनी डोक्यात काठीने मारहाण करत शिवीगाळ केल्या तक्रार राधानगरी पोलिसात दिली आहे.