26 जणांचा मृत्यू : केवळ एकच बचावला : अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
कीव्ह/ वृत्तसंस्था
युक्रेनमध्ये एका सैन्य विमानाच्या दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना पूर्व युक्रेनच्या खारकीव्ह शहरानजीक घडली आहे. खारकीव्ह एअरफोर्स युनिव्हर्सिटीचे 20 एअर कॅडेट आणि 7 चालक दलाचे सदस्य या प्रशिक्षणार्थी विमानातून प्रवास करत होते. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या देन जणांपैकी एकाचा शनिवारी मृत्यू झाला आहे.
चुह्युईव शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. चुह्युईवपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर प्रंटलाईन असून तेथे रशियनसमर्थक विघटनवादी सक्रीय आहेत. दुर्घटनेचा सीमेवरील तणावाशी कुठलाच संबंध नसल्याचा दावा सरकारने केला आहे.
क्रू कॅप्टनने चुह्युईव फ्लाइट कमांडरला डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळविले होते. कॅप्टनने रात्री 8.40 वाजता लँडिंगची अनुमती मागितली होती. तर 8.45 वाजता ही दुर्घटना घडली आहे. एंटोनोव-26 विमान एका रस्त्यानजीक कोसळले आहे. विमानाच्या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.