नवी दिल्ली
युपीआयच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात 3.86 लाख कोटींचे व्यवहार झाले आहेत. एनपीसीआय (भारतीय राष्ट्रीय देयक निगम)च्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये 2 अब्जहून अधिक देवाण घेवाणीचे व्यवहार झाले आहेत. विविध माध्यमातूनही युपीआयचा वापर अधिक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. 2016 मध्ये दाखल झालेल्या युपीआयचे या खेपेचे हे मोठे यश मानले जात आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदा व्यवहारांनी 1 अब्जचा आकडा पार केला होता.