प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 31 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1692 झाली आहे. दरम्यान, 31 रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1133 झाली आहे.
आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय11, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 1, कोव्हिड केअर सेंटर समाजकल्याण 7, कोव्हिड केअर सेंटर घरडा, खेड 6, कोव्हिड केअर सेंटर देवधे, लांजा 6 आणि ॲन्टीजेन टेस्ट १ येथील रुग्णांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण खालील प्रमाणे :
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी 18 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे ४ रुग्ण
दापोली ८ रुग्ण, ॲन्टीजेन टेस्ट १ रुग्ण, उक्ताड
83 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
चिपळूण येथील एका 83 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 58 झाली आहे.
तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे
रत्नागिरी – 13, खेड – 6, गुहागर – 2, दापोली – 11, चिपळूण – 12, संगमेश्वर – 7, लांजा – 2, राजापूर – 4, मंडणगड – 1
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह 1692
बरे झालेले 1133
मृत्यू 58
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 501