ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये आज कोरोनाचे 87 रुग्ण वाढले असून, राजस्थानमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 हजार 213 वर पोहचली आहे, अशी माहिती राजस्थानमधील आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सापडलेल्या 87 पैकी उदयपूरमधून 12, जयपूरमध्ये 32, पालीमध्ये 24, राजसमंदमध्ये 7, सवाई माधोपुरमध्ये 5, कोटामध्ये 3 आणि अन्य भागातील 4 जणांचा समावेश आहे.
या राज्यात आता पर्यंत 100 पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये जयपूरमधील 66 जण, जोधपुरमधील 17 आणि कोटातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांची लागण झाली होती.
दरम्यान, राज्यात 22 मार्च पासून लॉक डाऊन सुरू असून अनेक पोलिस हद्दीतील क्षेत्रात कर्फ्यू लावण्यात आला आहे.