प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील राजीवडा शिवखोल येथे दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाल़े ही घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडल़ी याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 15 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
नरूद्दीन महमद फणसोपकर (58) व लालखान अलिमियां सुवर्णदुर्गकर (47, ऱा दोघेही राजीवडा, शिवखोल) यांनी मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आह़े पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही तक्रारदार हे एकमेकांचे शेजारी आहेत़ शनिवारी दुपारी दुचाकी पार्क करण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाल़ा यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी झाल़ी
याप्रकरणी पोलिसांनी लालखान सुवर्णदुर्गकर, गुलजार सुवर्णदुर्गकर, खैरून सुवर्णदुर्गकर, इसार खान, नमा भाटकर, मलिना भाटकर, सिराज भाटकर, मुबशरिरा, नबीना व दुसऱया गटातील नरूद्दीन महमद फणसोपकर, इकबाल महमद फणसोपकर, जबीना नरूद्दीन फणसोपकर, आयशा इकबाल फणसोपकर, आष्णा इम्रान सुवर्णदुर्गकर, नसीम निजाम फणसोपकर (ऱा सर्व राजीवडा शिवखोल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़