शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या सर्व धारकऱयांना मदत करण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान ची बैठक साताऱयात संपन्न झाली. या बैठकीला भिडे गुरूजी उपस्थित होते. या बैठकीत रामजन्मभूमी निधी संकलन अभियान मदत म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदूस्तान सातारा विभागाने 11 हजार 111 रूपयांचा चेक दिला. हा चेक भिडे गुरूजीं यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सतीश बापू ओतारी, गणेश मेळावणे, शेखर पंडीत हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात भिडे गुरूजी यांनी महाराष्ट्रातील तसेच साताऱयातील सर्व धारकऱयांना या निधी संकलनात सहभागी व्हावे. तसेच गडकोट मोहीम विशालगड ते पन्हाळगड असे आयोजन येत्या 28 ते 31 जानेवारी केले आहे. या मोहीमेत जास्तीत जास्त धारकऱयांनी सहभागी व्हावे, तसेच रायगडावर खडा पहारा योजना सुरू केली आहे. यामध्ये जिह्यातील तरूणांनी सहभागी व्हावे असे आवाहन भिडे गुरूजी यांनी केले. यावेळी गणेश मेळावणे यांनी रामजन्मभूमी लढय़ाची इतिहास सांगितला. या प्रसंगी अजिंक्य गुजर, अभिजित बारटक्के, शुभम शिंदे, शुभम शेंडे, राहूल इंगवले, ओमकार डोमरे, स्विकृत नगरसेवक सुनिल कोळेकर, आरएसएसचे शेखर पंडीत, जयंत देशपांडे, स्विकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, सर्व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.