वार्ताहर/ रामदुर्ग
नूतन ग्राम पंचायत सदस्यांनी काँग्रेसशी एकनि÷ राहून गावचा विकास साधावा, असे मत माजी आमदार अशोक पट्टण यांनी व्यक्त केले. तालुक्मयातील हुलकुंद ग्राम पंचायतमध्ये बहुमत मिळविलेल्या सदस्यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते.
तालुक्मयातील ग्रामीण भागात ग्रा. पं. मधून जास्तीत जास्त काँग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तालुक्मयामध्ये वयाच्या 24 व्या वषी शानूर अत्तार सामान्य क्षेत्रामधून निवड झाल्याचे विशेष असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी काँग्रेस नेते बी. एस. नायक, रमेश अण्णीगेरी, आर. एल. निंगरेड्डी, के. के. बुदी, रमेश मुशन्नवर, शंकरगौडा पाटील, यमनप्पा पात्रोटी, रमेश बनेप्पगोळ, बसू नंदगावी आदी उपस्थित होते.