ऑनलाईन टीम / पिंपरी चिंचवड :
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला पिंपरी चिंचवडमध्ये अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून शरद पवार हे सुखरूप असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईकडे निघाले होते. अमृतांजन पुलाजवळ हा सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात झाला. शरद पवारांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्या गाडीला काहीही झालं नाही. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, अपघातग्रस्त वाहन हटवलं.
दरम्यान, शरद पवार यांनी स्वतः खाली उतरून जखमींची चौकशी केली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. शिवाय नुकसान भरपाई संदर्भात संबंधितांशी लवकर संपर्क साधावा अशा सूचना देखील पवार यांनी दिल्या आहेत.