म्हापसा / प्रतिनिधी
हल्लीच्या दिवसांत हडफडे तसेच वागातोरच्या किनारी भागात रेव्ह पार्टय़ाचे आयोजन झाल्याने याबाबतीत आपण स्वता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले मात्र यापुढे अशा प्रकारांना प्रोत्साहन देणार्या गोष्टींवर लगाम ठेवण्यासाठी किनारी भागातील घटनांची दैनंदिन नोंद ठवणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी पुढे सांगितले. दरम्यान, किनारी भागातील विवादास्पद पोलिस अधिकार्यांची ताबडतोब बदली करण्याची मागणी करीत शिवोलीचे आमदार विनोद पालयेंकर यांच्या तर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक निवेदन लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हणजुणचे पोलिस निरीक्षक याभागात नवीन पोलिस अधिकारी आहेत मात्र हणजुण पोलिस स्थांनकात दर पाच सहा महिन्यांनी वारंवार आपली बदली करून घेत याचभागात तळ ठोकुन राहाणार्या विवादास्पद पोलिस अधिकार्यांवर त्वरीत कारवाई होणे आवश्यक असल्याची लोबो यांनी मागणी केली. दरम्यान, राज्यातील अमली पदार्थाची देवाण घेवाण तसेच चोरी छुपे होत असलेल्या रेव्ह पार्टय़ा तसेच संबंधित अनैतिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी यापुढे सरकारचे ग्रुह खाते, पोलीस दल, तसेच स्थानिक आमदार , स्थानिक सरपंच आदींनी एकत्रित येत या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याच्या द्रुष्टीने कठोर पाऊले उचलण्याची नितांत आवश्यकता असल्याचे लोबो यांनी शेवटी सांगितले. दरम्यान, बागा येथील डोंगरकडा यावषी झालेल्या धुवांधार पावसामुळे कोसळल्याने लवकरच जलसिंचन खात्याच्या मदतीने येथील भुभागाचे सर्वेक्षण केल्यानंतर रस्त्याशेजारी मजबूत संरक्षक भींत उभारण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना दिले. मागच्या वषी अशाचप्रकारे येथील डोंगरकडा कोसळल्याने दोन कोटींचे काम हाती घेण्यात आले होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सरकार कोवीड महामारी आटोक्मयात आणण्यासाठी आवश्यक उपाय योजना अंमलात आणत असल्याचे सांगतानाच कोवीड रुग्णांच्या बदल्यात सरकारला विशेष निधी प्राप्त होत असल्याच्या गोष्टीचा मंत्री लोबो यांनी इन्कार केला.