इंग्लंडच्या संगीत शिक्षण अभ्यासक्रमात ‘मुन्नी बदनाम हुई’ गाणं
इंग्लंडच्या डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनने एक नवा म्युझिक करिकुलम सादर केला आहे. यात भारतीय संगीतजगतातील काही विशेष गाण्यांना सामील करण्यात आले आहे. यात मलायका अरोराचे चार्टबस्टर साँग ‘मुन्नी बदनमा हुई’चाही समावेश आहे. हा पूर्ण अभ्यासक्रम युकेतील 15 संगीतशिक्षण तज्ञ, शिक्षक, शैक्षणिक तज्ञ आणि संगीतकारांनी तयार केला आहे. शाळांमध्ये उच्च गुणवत्तेचे संगीत शिक्षण देण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमात याचबरोबर ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले ‘जय हो’, अनुष्का शंकरचे ‘इंडियन समर’ आणि किशोरी आमोणकर यांचे ‘सहेली रे’ या गाण्यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. मुन्नी बदनाम हुई या गाण्याचा उल्लेख करत बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबर कुठल्याही संबंधित प्लॉटशिवाय टाकले जात असल्याचे म्हटले गेले आहे. या गाण्यावर मलायक अरोरा थिरकताना दिसून येते.