प्रतिनिधी / लांजा
सोमवारी दिवसभर उष्णता वाढल्याने हैराण झाले असतानाच सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अचानक लांजा तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाळी पूर्व भाजावळींची कामे सुरू असतानाच पावसामुळे भाजावळीच्या कामात व्यत्यय आला आहे.