वृत्तसंस्था/ लॉस वेगास
लॉस वेगास या शहरात 2020 मधील सर्वात मोठय़ा इलेक्ट्रिक उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. (सीइएस 2020) शो मध्ये लेनोओ कंपनीचा थिंकपॅड एक्स-1 लॅपटॉप सादर करण्यात आला आहे. हे उपकरण मोठय़ा टॅब्लेट किंवा लॅपटॉपसारखे असून यांचे वेगळेपण म्हणजे हा लॅपटॉप जगातील पहिला फोल्डेबल म्हणून ओळखला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
जगातील पहिला फोल्डेबल लॅपटॉप असून याला बंद केल्यानंतर एखाद्या पुस्तकाप्रमाणे दिसून येत आहे. याला सर्वत्र घेऊन जाण्यास सोपे होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यांची किंमत 2,499 डॉलर(1,79,466 रुपये) असून याची विक्री दुसऱया सहामाहीपासून सुरु होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
थिंकपॅड एक्स-1 मधील सुविधा
w 13.3 इंच आकाराचा फोल्डींग डिस्प्लेची स्क्रीन
w लॅपटॉपसोबत ब्लूटय़ूथ कीबोर्ड
w या उपकरणाचे वजन 1 किलोग्रॅमहून कमी आहे.
w मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपर्रेटिंग सिस्टम
w 5-जी कनेक्टिविटीची मिळणार सोय
8 जीबी रॅम-1टीबी ऑनबोर्ड स्टोरेज
4-जी/5-जी सिमकार्डची सुविधा
फास्ट चार्जिंग बॅटरीच्या आधारे 50 तासांचा बॅकअप
5-मेगाफिक्स्लचा वेब कॅमेऱयासह डॉल्बी स्पीकर्सची सुविधा