प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर तालुक्मयातील चोर्ला गावात नेत्रतज्ञ डॉ. तेजस्वी तीर्थहळ्ळी यांनी लोककल्प फौंडेशनच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. लोककल्प फौंडेशनने दत्तक घेतलेल्या 32 गावांपैकी चोर्ला गाव एक आहे. ही गावे खानापूरच्या जंगलात वसलेली असून मूलभूत सोयीसुविधांचा तेथे अभाव आहे. सामान्य लोक त्यांच्या डोळय़ांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. परंतु डोळे मानवी शरीराचे सर्वात महत्त्वाचे अवयव आहेत आणि त्याकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ नये. त्यामुळेच या नेत्र शिबिरात डोळय़ांच्या सामान्य समस्या आणि त्यावर योग्य उपचार याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. तेजस्वी तीर्थहळ्ळी यांच्यासह ज्येष्ट तज्ञ डॉ. मूर्ती श्रीनिवास, भाग्यश्री पाटील, दर्शना आणि सुनील यांनी नेत्र तपासणी केली. लोककल्प फौंडेशन गावकऱयांना मोफत चष्मे वाटप करणार आहेत. याप्रसंगी लोककल्प फौंडेशनचे संस्थापक किरण ठाकुर व लोककल्पचे पदाधिकारी उपस्थित होते.