प्रतिनिधी / सांगली
लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या शाखा अंतर्गत ठेवी वाढविण्याच्या स्पर्धेमध्ये सांगलीतील विश्रामबाग शाखेने क गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. शाखाधिकारी पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शाखेची घोडदौड सुरूच असून सर्वात कमी वेळेत 10 कोटी रू. ठेवींच्या टप्पा पार केलेली विश्रामबाग ही एकमेव शाखा ठरली. सदर स्पर्धा एकूण 3 – अ, ब आणि क अशा गटामध्ये घेण्यात आली होती
अ वर्गांतर्गात 30 कोटींवरील शाखा, ब वर्गामध्ये 20 कोटिंवरील शाखा तर क वर्गामध्ये 10 कोटींवरील शाखा असे वर्गीकरण करण्यात आले होते. या निमित्ताने विजेत्यांचे अभिनंदन तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण नवलाई यांचा वाढदिवस प्रमुख पाहुणे प्रसिद्ध जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. यावेळी लोकमान्य सोसायटी नेहमीच सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात पुढे असते. असे मनोगत लक्ष्मण नवलाई यांनी व्यक्त केले. तसेच लोकमान्य ची प्रगती अविरत होत राहो या शुभेच्छा जिल्हा सरकारी वकील उल्हास चीप्रे यांनी दिल्या.
सदर कार्यक्रमास सांगली विभागीय व्यवस्थापक सूदत्त पाठक, उपव्यावस्थपक प्रदिप पाटील, मार्केटिंग मॅनेजर अमीत महामुनी उपस्थित होते. लोकमान्य ची ओळख, लोकमान्य चे व्यवसाय आणि विविध योजनांची माहिती सुदात्त पाठक यांनी दिली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, अशा अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली.
विश्रामबाग शाखा व्यवस्थापक पंडितराव पाटील यांना श्रीयुत लक्ष्मण नवलाई व प्रमुख पाहुणे उल्हास चिप्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. तसेच सर्व शाखा कर्मचारी यांना पुष्गुच्छ देवून गौरविण्यात आले. व शाखेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.