प्रतिनिधी/ सातारा
भारतातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या लोकमान्य को-ऑप सोसायटीने “लोकमान्य सुखदा ठेव योजना’’ सुरू केली आहे. लोकमान्य आपल्या ठेव योजनांवर सर्वाधिक परतावा देण्याबद्दल प्रसिद्ध आहे. लोकमान्य सोसायटी आपल्या पारंपारिक मुदत ठेवी आणि पुनरावर्ती ठेव योजनांव्यतिरिक्त ग्राहकांच्या सूचना आणि आवश्यकतांचा विचार करून नवनवीन ठेव योजना सादर केल्या आहेत . लोकमान्य सुखदा ठेव योजना आकर्षक 8. 65ज्ञ् व्याजदर देत कमी कालावधीत अधिक परतावा देते , योजना 500 दिवसांच्या मुदतीसाठी आहे. ग्राहक 10000/- किंवा अधिक 1000/- च्या पटी मध्ये रक्कम गुंतवू शकतात. ज्येष्ठ नागरिक अतिरिक्त व्याज @0.50ज्ञ् मिळविण्यास पात्र आहेत. 10 लाख रुपयांची एकच पावती असलेले मोठे ठेवी धारक देखील अतिरिक्त व्याज @0.50ज्ञ् साठी पात्र आहेत. काही अटी व शर्तींवर ठेव योजना मुदतपूर्व बंद करण्याची आणि ठेव तारण कर्ज योजने ची सोय देखील आहे
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यात आणि दिल्लीत 213 शाखांचे विस्तृत जाळे व 1700 हून अधिक कर्मचारी असलेली लोकमान्य सोसायटी आपल्या ग्राहकांना समर्पक आणि सेवाभावनेने सुरक्षित व पारदर्शक सेवा देत असते.