प्रतिनिधी / घुणकी
किणी – घुणकी परिसरात काल झालेल्या वादळी वारा . व पाऊस यामुळे ऊध्वस्थ झालेला किणी टोल नाका येथील तपासणी नाका प्रशासनाच्या जोरदार प्रयत्नामुळे अवघ्या १२ तासात दुप्पट क्षमतेने सुरु झाला आहे . कोरोणा च्या संसर्गा पासून कोल्हापूर जिल्हा सुरक्षित रहावा या साठी इथे दिवस -रात्र धडपडणारे प्रशासनातील अधिकारी . कर्मचारी ‘ योद्धेच असलेचे आपले कामातून सिद्ध करून दाखवले आहे . दरम्यान राज्यभरातून प्रचंड संख्येने येणाऱ्या प्रवाशा मुळे इथे जत्रेचे स्वरूप आले आहे.
कालसायंकाळी किणी परिसरात झालेल्या वादळी वारा व पावसात कणे गांव ( जि सांगली ) व किणी टोल नाक्यावर राज्य भरातून कोल्हापूर मध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी प्रशासनाकडून ऊभारणेत आलेला तपासणी नाका पूर्णता ऊध्वस्थ झाला . इथे काम करणारे पोलिस . व इतर कर्मचारी जखमीही झाले . याचा फायदा घेत काही महाभाग भूमीपुत्र सुसाट सुट्ले . मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रथमता वडगांव पोलिस ठानेचे पोनि . प्रदिप काळे यांनी स्वःता सर्व सूत्रे हाती घेत अवघ्या अर्ध्या तासात परत तपासणी नाका सुरु केला . सर्व प्रवाशांची प्रवेशपत्रिका खातरजमा करत त्यांना हस्तलिखीत टोकन देत प्रक्रिया सुरु केली.
रात्री ऊशीरा जिल्हाधीकारी दौलत देसाई यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली . तर परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून तपासणी नाका ऊभारणी व कार्यक्षम करणेबाबत सूचना केल्या . त्या नंतर आपत्ती व्यवस्थापण चे निवासी ऊप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी रात्री ऊशीरापर्यंत ठाण मांडत व शुक्रवारी सकाळपासून तहसिलदार प्रदिप ऊबाळे यांचे सह सार्वजनीक बांधकाम चे अभियंता के .डी.मुधाळे मंडल अधिकारी वनिता खाडे यांचे सह अधिकारी . कर्मचारी यांचे मदतीने कणेगांव व किणी येथील दोनही तपासणी नाके दुप्पट क्षमतेने म्हणजे नऊ बुध कार्यरत केले . तर सार्वजनीक बांधकाम खातेच्या अधिकारी यांचे देखरेखे खाली मजबूत असे दुसरे बुध ऊभारणीचे काम अंतीम टप्यात आहे . येथे ऊदया सकाळ पासून सर्व अद या वत सुविधा सह कार्यरत होईल असा विश्वास येथे कार्यरत असणारे अधिकारी यांनी व्यक्त केला .
कोल्हापूरच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकारी बूथवर
वादळी वाऱ्यात तपासणी नाका व सर्व यंत्रणा बंद पडली . येथील कर्मचारी ही जखमी झाले . याचा फायदा ऊठवत किमान ३०ते ४० वाहने तपासणी शिवाय निघून गेले . तर ऊर्वरीत कर्मचारी या आस्मानी संकटाने भेदरले होते . अशा परस्थितीत वडगांव पोलिस ठाणेचे पोनि . प्रदिप काळे टोल नाक्या वरील दोन बूथ ताब्यात घेवून येणाऱ्या प्रत्येक वाहणाची तपासणी . त्यांचे प्रवेशपत्र पडताळणी व त्यांना हस्तलिखित टोकण देत शिस्त लावणेचे काम आपल्या सहकाऱ्यासह केले .वडगांव पोलिसांनी सकाळी प्रशासनाची यंत्रणा येईपर्यंत बंदोबस्त व तपासणी .टोकण असे काम चोख बजावले .
१७ मे नंतर लॅाक डाऊन कडक होणार या अनाठाई भितीने प्रवाशांचे लोंढे. प्रत्येकाला आपल्या घराची ओढ नैसर्गीकच असते मात्र पुणे मुंबईसह राज्यभरातील ऊच्च शिक्षिता पासून ते अशिक्षित पर जिल्हया तून येणाऱ्या प्रवाशांच्या मनात १७ मे नंतर लॅाक डाऊन ची कडक अंमल बजावणी होणार असलेची भिती व अफवा या मुळे इतर जिल्हयातील लोंढे आपल्या गावाकडे वळलेच वास्तव त्यांच्याशी केलेल्या बातचीती नंतर कळाले .
प्रशासनाने मनावर घेतल आणि भुईसपाट झालेली यंत्रणा पुन्हा जोमाने कार्यरत झाली
कालच्या वादळी वाऱ्यात किणी -व .कणेगांव येथील तपासणी नाके येथील यंत्रसामुग्रीसह विस्कळीत झाली होती . जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री ऊशीरा भेट देवून यंत्रणा जोमाने कार्यरत करणे संबधी सूचना केल्या . सोबत सार्वजणी क बांधकाम चे अधिक्षक अभियंता संभाजी माने . कार्यकारी अभियंता .एस डी सोनावणे यांना घेवून मजबूत बुथ ऊभारणीचा आराखडा तात्काळ देणेच्या सूचना तर तांत्रीक बाबी साठी आपत्ती व्यवस्थापणचे संजय शिंदे यांना जिल्हाधीकारी कार्यालयातील संगणक तज्ञ यांची मदत घेणेच्या सूचना तर तहसिलदार प्रदिप ऊबाळे यांचेकडून मनुष्यबळ व इतर बाबी च्यां पूर्ततेच्या सूचना केल्या .परिणामी या सर्व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी अवघ्या काही तासात तपासणी नाका दुप्पट क्षमतेने म्हणजे पूर्वी ५ बूथ कार्यरत होते . आज ९ बुथ कार्यरत करून प्रशासनाची कार्यतप्तर ते ची चुणुक दाखवली.