प्रतिनिधी / बेळगाव
संसाराची सारी दुःखे विसरायला लावून भक्तीमध्ये मन तल्लीन होणारी जागा म्हणजे पंढरीची वारी. हातात भगव्या पताका, डोक्मयावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भजन किर्तन करत वारकरी वारीत सहभागी होतात. या वारीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. आजवर विठ्ठलावर अनेक गाणी लिहिली गेली. परंतु मागील अनेक वर्षांपासून शेकडो मैल चालणाऱया वारकऱयांवर गाणे नव्हते. याचा विचार करून बेळगावमधील काही हौशी लोकांनी एकत्रित येत वारी हे गाणे तयार केले.
पेशाने सीए असणारे अशोक परांजपे यांच्या डोक्मयात वारीवर गाणे तयार करण्याची संकल्पना आली. त्यांनी प्रारंभी स्वॅन म्युझिक ब्ा्रsव्हरी स्टुडिओची स्थापना केली. त्यातूनच फेथ (विश्वास) हा अलबम तयार करण्याचा विचार केला. यातील पहिले गाणे हे त्यांनी वारीवर तयार करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांनी हे गाणे तयार केले आहे. शुक्रवार दि. 2 रोजी हे गाणे लॉंन्च होणार आहे. सायंकाळी 6 वा. स्वॅन म्युझीक ब्रेव्हरी च्या यू टय़ूब चॅनलवर हे गाणे पाहता येणार आहे.
स्थानिक वारकऱयांच्या आवाजाने घुमला गजर
वारीमध्ये सहभागी होणारे वारकरी हे सर्वसामान्य असतात. त्यामुळे त्यातील बोल किंवा आवाज हा देखील सर्वसामान्यांचाच हवा, हा अट्टहास अशोक परांजपे यांचा होता. त्यामुळे सावगाव येथील यल्लाप्पा व परशराम अशा दोन वारकऱयांच्या आवाजाने या गाण्यातील गजर घुमला. या गाण्यातील बोल देखील अत्यंत साधे व वारकरी दररोज वापरणारे असेच आहेत. पसायदानातील ‘दुरीतांचे तिमिर जावो’ या ओळींचाही समावेश करण्यात आल्याने ही वारी सर्वसमावेशक झाली आहे.
हे गाणे तयार होण्यासाठी अमित सौंदलगेकर, सीए वर्षा परांजपे, डॉ. वर्षा साठे, राज बेळगावकर, अमित कुलकर्णी, डॉ. सुरज जोशी, अनुपमा जोशी, स्वरांजली जोशी, निरज परांजपे, सलील परांजपे, परिनीता, समर्पित यांची मोलाची साथ लाभली. भविष्यात स्थानिक कलाकार व येथील परंपरा यांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.