चिपळूण
शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे वाशिष्ठी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या विद्यार्थ्यांने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती.
स्वयंम संदीप तांबे (16, कळंबस्ते-खालचीवाडी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याबाबची माहिती संदीप गंगाराम तांबे (42, कळंबस्ते-खालचीवाडी) यांनी चिपळूण पोलिसांना दिली. स्वयंम हा वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. तो नदीत पोहत असतानाच प्रवाहामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याचा मृतदेह बहाद्दूरशेख जुवाड पुलाजवळ नदीपात्रात आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.