दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्यासोबत करणार काम
दक्षिणेतील सुपरस्टार विजय देवरकोंडाने स्वतःच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अर्जुनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हेच करणार आहेत. या चित्रपटाची घोषणा निर्माता आणि अभिनेत्याने स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवर पोस्टर शेअर करत केली आहे.
बॉलिवूडमध्ये करण जौहरचे प्रॉडक्शन हाउस धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत पुरी जगन्नाथ यांचे दिग्दर्शन लाभलेल्या ‘लायगर’ चित्रपटामधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात विजय स्ट्रीट फायटरपासून एमएमए फायटरपर्यंतचा प्रवास करताना दिसून येईल. चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि किक बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसन देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. याचबरोबर राम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी यासारखे कलाकारही यात झळकणार आहेत.
लाइगर चित्रपट निर्मितीचे काम सध्या अंतिम टप्यात असून लवकरच तो हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.