केईआरसीची हुबळी येथे होणार बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक इलेक्ट्रिसिटी रेग्यलेटरी कमिशन (केईआरसी) तर्फे सोमवार दि. 22 रोजी सकाळी 11 वा. हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात केल्या जाणाऱया वीज दरवाढीबाबत या बैठकीत आक्षेप नोंदविले जाणार आहेत. त्यामुळे ज्या व्यक्ती, संस्था यांना आक्षेप नोंदवायचा असेल त्यांनी या बैठकीला हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावषी देखील 1 एप्रिलपासून नवे वीजदर लागू केले जाणार आहेत. महागाईचा भडका, कोरोनामुळे मंदावलेले व्यवसाय अशा परिस्थितीतच वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मागीलवेळी दरवाढ करण्यास विलंब झाल्यामुळे यावेळी मोठी दरवाढ होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. त्यामुळे अधिकाधिक व्यक्तींनी या दरवाढी विरोधात आक्षेप नोंदविणे गरजेचे आहे.
हुबळी येथे होणाऱया या बैठकीला बेळगाव जिल्हा सरकारमान्य इलेक्ट्रिक कंत्राटदार असोसिएशन सोबतच बेळगावमधील उद्योजक, व्यापारी जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.